Advertisement

न्यूझीलंडने दाखवली आयपीएल आयोजनाची तयारी

भारतात स्पर्धा होणं याला बीसीसीआयचं प्राधान्य आहे. मात्र, देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर यंदाचा हंगाम देशाबाहेर आयोजित करण्याचाही विचार सुरु आहे.

न्यूझीलंडने दाखवली आयपीएल आयोजनाची तयारी
SHARES

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल स्पर्धेचा १३ वा हंगाम कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. मात्र, आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने या हंगामाचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. श्रीलंका आणि युएईनंतर आता न्यूझीलंडनेही आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे.


यंदाची आयपीएल स्पर्धा देशाबाहेर जाणार असल्याचं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. याआधीही २०९ साली आयपीएलचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत तर २०१४ साली युएईमध्ये करण्यात आलं होतं. आता न्यूझीलंडने आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, याबाबत बीसीसीआय नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं आहे.


भारतात स्पर्धा होणं याला बीसीसीआयचं प्राधान्य आहे. मात्र, देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर यंदाचा हंगाम देशाबाहेर आयोजित करण्याचाही विचार सुरु आहे.  स्पर्धेशी संबंधित सर्व व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर याबद्दल निर्णय घेतला जाईल. आयोजन कुठेही करण्यात आले तरीही खेळाडूंची सुरक्षा हा पहिला महत्वाचा मुद्दा असणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा