Advertisement

रोहित शर्मा सुरक्षित, कोरोनाचा कोणताही धोका नाही; बीसीसीआयचं स्पष्टीकरण

क्वारंटाइनमध्ये असलेला रोहित शर्मा पूर्णपणे सुरक्षित, अत्यंत आनंदी आणि समाधानी असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

रोहित शर्मा सुरक्षित, कोरोनाचा कोणताही धोका नाही; बीसीसीआयचं स्पष्टीकरण
SHARES

क्वारंटाइनमध्ये असलेला रोहित शर्मा पूर्णपणे सुरक्षित, अत्यंत आनंदी आणि समाधानी असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. सिडनीमधील एका हॉटेलमध्ये हिटमॅन रोहित शर्मा क्वारंटाइनमध्ये आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सिडनीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळं रोहित शर्माच्या सुरक्षेवर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर सिडनी इथं रोहित शर्मा याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. रोहित शर्माचं क्वारंटाइनमधील अखेरचे काही दिवस बाकी आहेत. मात्र, गेल्या आठवड्यापासून सिडनीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं संघ व्यवस्थापन सातत्यानं रोहित शर्माच्या संपर्कात आहे.

तो विलगीकरणात तसंच बायोबबलमध्ये आहे. तो आपल्या रुममध्ये एकटाच आहे. तिथं जर काही वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि रोहितला जर सिडनीमधून बाहेर काढायचं असेल तर ते प्रयत्नदेखील करण्यात येतील, असा खुलासाही बीसीसीआयनं केला आहे. सिडनीच्या उत्तरेकडील किनाऱ्यांवर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळं 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया' संघटनेला स्थानिक प्रशासनानं अतिदक्षतेचा इशारा दिला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरीही न्यू साऊथ वेल्सकडील सीमा क्वीन्सलॅण्डसाठी बंदच राहिल्यास खेळाडू आणि प्रक्षेपण कर्मचाऱ्यांना चौथ्या कसोटीसाठी सिडनीहून ब्रिस्बेनला जाता येणार नाही.

सिडनी इथं होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे. ७ जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळं कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण झाली नाही तर रोहितला सिडनी मध्येच रहावे लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा