सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत पराग पिंगळे विजयी

 Shivaji Park
सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत पराग पिंगळे विजयी

शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत पराग पिंगळे यांनी 15 धावांनी विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे या स्पर्धेत वय वर्षे 40च्या पुढे असलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. असे एकूण 20 स्पर्धक यात सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुनील रामचंद्रन (सहाय्यक जनरल सेक्रेटरी, एसपीजी), प्रशांत गावडे, तसेच शिवाजी पार्क जिमखान्यातील अंडर 14 मध्ये खेळणारा राज वाघेला यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.

या स्पर्धेत विजय मिळवलेल्या पराग पिंगळे यांना 5000 रु आणि चषक देउन सन्मानित करण्यात आले, तर उपविजेता राजा अडातराव यांना 3000 रु. आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण एसपीजीचे चेअरमन अविनाश कामत आणि कॅप्टन साने यांच्या हस्ते झाले.

Loading Comments