Advertisement

एमआयजी, पय्याडेचा शानदार विजय


एमआयजी, पय्याडेचा शानदार विजय
SHARES

'एमआयजी क्रिकेट क्लब' आणि 'पय्याडे स्पोर्टस् क्लब'ने ७० व्या 'पोलीस इन्व्हीटेशन शिल्ड क्रिकेट टुर्नामेंट'मधील दुसऱ्या फेरीत शानदार खेळी करत विजय मिळवला. ब गटातील 'एमआयजी क्लब'ने 'पी. जे. हिंदू जिमखाना संघा'ला त्यांच्या घरच्या मैदानावर २६२ रन्सच्या फरकाने पराभूत केलं. तर 'कर्नाटक स्पोर्टींग असोसिएशन'विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत पय्याडेने २० रन्सच्या फरकाने विजय मिळवला.


घाडीगावकरची डबल सेंन्च्युरी

या टुर्नांमेंटमध्ये 'पी. जे. हिंदू जिमखाना' विरुद्ध झालेल्या लढतीत 'एमआयजी'च्या सुमीत घाडीगावकरने आक्रमक खेळी करून डबल सेन्च्युरी मारली. सुमीतच्या डबल सेन्च्युरीच्या जोरावर 'एमआयजी'ने ७० षटकाच्या सामन्यात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ४१९ रन्सचा डोंगर रचला. सुमीतसोबतच स्वप्नील प्रधान ७५ आणि गौरव जठार याने ५८ रन्स केल्या. सलील आगरकर हा हिंदू जिमखान्याचा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४/१३० अशी कामगिरी केली.


धुलपची तिखट गोलंदाजी

'एमआयजी'च्या विनीत धुलप याने 'पी. जे. हिंदू' संघाचे ७ विकेट्स घेऊन संघाला एकहाती विजय मिळवून दिला. संपूर्ण 'पी. जे. हिंदू' संघाचा खेळ ३५.५ ओव्हर्समध्ये अवघ्या १५७ रन्समध्ये आटोपला. 'हिंदू जिमखान्या'चा बॅट्समन निशाद गभावाला याने ४४ रन्स केल्या.


अटीतटीची लढत

तर, अ गटात झालेल्या दुसऱ्या सामन्यात पय्याडे संघाचा बॅट्समन आकाश आनंद याच्या (१०९ रन्स) सेंन्च्युरीच्या जोरावर पय्याडेने कर्नाटकविरोधात ७ बाद ३२७ रन्स केल्या. आकाशला पराग खानापूरकर ८६, हर्ष टॅंक ५५, राहुल लाड याच्या ४५ रन्स यांची चांगली साथ मिळाली.


शिवमची सेंन्च्युरी व्यर्थ

३२८ रन्सचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कर्नाटकने आश्वासक सुरूवात केली. कर्नाटकच्या शिवम दुबे याने १३९ रन्स करत संघाला विजयाच्या जवळपास नेलं. पण अमेय्या सोमन ४६ रन्स आणि विनायक भोईर ३० रन्स वगळता त्याला इतर कुठल्याही बॅट्समनची साथ न मिळाल्याने कर्नाटकला ५७ ओव्हरमध्ये ३०७ रन्सपर्यंतच मजल मारता आली. पय्याडेचा बाॅलर हरमीत सिंग याने ७३ रन्समध्ये ५  विकेट्स आणि पराग खानापूरकरने ६५ रन्समध्ये ३ विकेट्स घेत कर्नाटकचं आव्हान मोडीत काढलं. ही स्पर्धा 'केएसए' मैदानावर खेळवण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा