Advertisement

धोनी निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस - लतादीदी

न्यूझीलंडकडून पराभूत होत भारत क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची.

धोनी निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस - लतादीदी
SHARES

न्यूझीलंडकडून पराभूत होत भारत क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची. ही बाब धोनीच्या कट्टर चाहत्यांना नक्कीच रूचलेली नाही. यांत गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या नावाचासुद्धा समावेश आहे. त्यांनी तर धोनी तू निवृत्तीचा जराही विचार करू नकोस, असा आपुलकीचा सल्लाच ट्विटरवरून दिला आहे.  

समिक्षकांची टीका

डावाला फिनिशिंग टच देणारा धोनी आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु संपूर्ण विश्वषचकात धोनीच्या संथ खेळावर चोहोबाजूने टीका झाली. धोनीला आता आक्रमक फलंदाजी करायला जमत नाही. धोनीमुळे आपण मॅच गमावली, अशी टीका त्याच्यावर क्रिकेट समिक्षकांनी केली. त्यातच धोनी विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार, अशा बातम्याही मधल्या काही दिवसांत पसरल्या. 

चाहते नाराज

त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली.  वयामुळं धोनीच्या खेळातील आक्रमकता कमी झाल्याचं खरं असलं, तरी आजही तो मॅचविनर असल्याचं त्याच्या चाहत्यांना वाटतं. त्यामुळे धोनीने आताच निवृत्ती घेऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार ट्विटरच्या माध्यमातून लता मंगेशकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

“नमस्कार एम एस धोनी. तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असं माझ्या कानावर आलं आहे. कृपया तुम्ही असा विचार करु नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारही तुम्ही मनात आणू नका अशी माझी विनंती आहे”, असं लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमध्ये धोनीला उद्देशून लिहिलं आहे.



हेही वाचा-

बुद्धीबळाच्या प्याद्यांपासून साकारली 'माही'ची भली मोठी प्रतिकृती

राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा