Advertisement

शिवाजी पार्क जिमखाना निवडणुकीत प्रवीण अमरे अध्यक्षपदी


शिवाजी पार्क जिमखाना निवडणुकीत प्रवीण अमरे अध्यक्षपदी
SHARES

देशाला अनेक महान क्रिकेटपटू देणाऱ्या अाणि क्रिकेटसह अन्य खेळातही जवळपास १०० वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या त्रैवार्षिक निवडणुकीत भारताचे कसोटीपटू प्रवीण अमरे पुन्हा एकदा अध्यक्षपदी बिनविरोध निवडून अाले अाहेत. कार्यकारी मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत अविनाश कामत, संजीव खानोलकर अाणि दीपक मुरकर यांच्या केकेएम पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून अाले अाहेत.


४ उमेदवार बिनविरोध

शिवाजी पार्क जिमखान्याच्या २२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत चार उमेदवार बिनविरोध निवडून अाले होते. त्यात माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांचाही समावेश होता. उर्वरित १८ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात होते. त्यात अविनाश कामत कार्याध्यक्षपदी, संजीव खानोलकर हे जनरल सेक्रेटरीपदी तर दीपक मुरकर हे कार्योपाध्यक्षपदी निवडून अाले.


अशी असेल कार्यकारिणी

विश्वस्त - समाधान सरवणकर, महेंद्र ठाकूर, दीपक विश्वासराव
अध्यक्ष - प्रवीण आमरे
उपाध्यक्ष - डॉ. विकास दुबेवार, हिरेन कुळकर्णी, विलास साळुंके
कार्याध्यक्ष - अविनाश कामत
कार्योपाध्यक्ष - दीपक मुरकर
जनरल सेक्रेटरी - संजीव खानोलकर
असिस्टंट जनरल सेक्रेटरी - सुनील रामचंद्रन
खजिनदार - फाल्गुन देसाई
कार्यकारीणी सदस्य - विजयसेन पाठारे, सनिल समेळ
टेनिस सेक्रेटरी - योगेश परुळेकर; टेनिस सदस्य - चंद्रकांत राऊत
कार्ड सेक्रेटरी - प्रशांत गावडे
बिलियर्डस सेक्रेटरी - प्रमोद कुलकर्णी
बैठे खेळ सेक्रेटरी - योगेश पवार
क्रिकेट सेक्रेटरी - सुशांत मांजरेकर; क्रिकेट सदस्य - राजीव अदतराव.


हेही वाचा -

शिवाजी पार्क जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांची बॅटिंग...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा