रामचंद्र गुहा यांची बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला सोडचिठ्ठी

 Mumbai
रामचंद्र गुहा यांची बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला सोडचिठ्ठी

प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखर रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुहा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर चार जणांच्या प्रशासकीय समितीची नियुक्त केली होती. याच समितीवर रामचंद्र गुहा हे देखील होते.

गुहा यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. आपण वैयक्तिक कारणावरून राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. न्यायालयाने 30 जानेवारी 2017 ला ही समिती स्थापन केली होती.

Loading Comments