Advertisement

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी फिरकीपटू रमेश पोवारची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवार
SHARES

इंडियन महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) ही नेमणूक केली असून, या पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते आणि ३५हून अधिक जणांनी या पदासाठी आपलं नाव दिले होते. सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंह यांच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने अर्जदारांची मुलाखत घेतली आणि पोवारच्या नावावर एकमताने सहमती दर्शविली.

रमेश पोवारनं भारताकडून २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पोवारने प्रशिक्षणाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. यंदाची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा जिंकणार्‍या मुंबई संघाचा पोवार प्रशिक्षक होता. त्यानं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.

महिल्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण 35 जणांनी अर्ज केले होते. त्यातून 8 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये डबल्यू व्ही रमन, रमेश पवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश होता. या 8 जणांची मुलाखत ही (Cricket Advisory Committee) बीसीसीआयच्या सल्लागार समितीने घेतली. या समितीमध्ये मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंगचा समावेश होतेा. मात्र या ८ जणांना पोवार पुरुन उरले. अखेर सल्लागार समितीने पोवार यांची प्रशिक्षक पदासाठी नाव अंतिम केलं.

प्रशिक्षक म्हणून पोवारांची ही दुसरी वेळ आहे. त्यांनी याआधी जुलै-नोव्हेंबर २०१८ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलंय. पोवारांच्या प्रशिक्षणाखाली महिला टीमने २०१८ च्या टी २० वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती.हेही वाचा -

एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार

परराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा