Advertisement

भारतीय संघाला बदलाची गरज -रॉबिन सिंह


भारतीय संघाला बदलाची गरज -रॉबिन सिंह
SHARES

भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड कप २०१९ मध्ये उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळं क्रिकेटप्रेमींकडून भारतीय संघावर टीका केली जात आहे. अशातचं आता मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर माजी अष्टपैलू रॉबिन सिंह यांनी निशाणा साधला आहे. दोन विश्वचषक स्पर्धांमधील उपांत्य लढतीत भारत पराभूत झाला आहे. त्यामुळं आताच प्रशिक्षणाच्या रचनेत बदल करणं गरजेचं आहे, असं रॉबिन सिंह यांनी म्हटलं. रॉबिन सिंह यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्जही केला आहे.

तांत्रिकदृष्ट्या खेळ

'तुमची स्वतःची मानसिक तयारी असावी लागते. संघ आणि खेळाडू ज्या परिस्थितीचा सामना करतात, त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. संघासाठी तयार केलेल्या योजनांमध्ये सहभागी व्हावं लागतं. तांत्रिकदृष्ट्या खेळ समजून घेतला तरच, तुम्ही हे सर्व करू शकता,' असं रॉबिन यांनी म्हटलं.

प्रशिक्षकपदाची धुरा

रवी शास्त्री यांच्याकडेच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. रॉबिन सिंह देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. १३६ एकदिवसीय सामन्यांत रॉबिन सिंह यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचप्रमाणं, २००७-०८ मध्ये भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदही सांभाळलं होतं.हेही वाचा -

असं पहिल्यांदाच घडणार, विंडिज दौऱ्याआधी विराट एकटाच घेणार पत्रकार परिषद

बिग बॉसच्या प्रेक्षकांना बिचुकलेचा नमस्कारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा