Advertisement

'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद
SHARES

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यानुसार, यंदाच्याही आयपीएलमध्ये रोहितने नवा विक्रममुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कुलदीप यादवला षटकार लगावत रोहित शर्माने आयपीएलच्या कारकिर्दीतील २०० षटकार पूर्ण केले.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत केकेआरसमोर १९६ धावांचं आव्हान ठेवलं. पहिल्या सामन्यात मुंबईला दमदार सुरूवात मिळवून देणारा क्विंटन डी कॉक कोलकाताच्या शिवम मावीचा पहिला बळी ठरला. दुसऱ्याच षटकात तो १ धाव काढून माघारी परतला. पण रोहितशर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी सुरूवात केली.

या सामन्यात रोहित शर्माने आयपीएल २०२०च्या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडू पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. पॅट कमिन्सला कोलकाताने १५.५० कोटींमध्ये विकत घेतले. तो आज पाचवं षटक टाकायला आला. पहिला चेंडू त्याने वाइड टाकला. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर रोहितने उत्तुंग असा षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतरही त्याने पॅट कमिन्सचा जोरदार समाचार घेतला.

रोहित शर्माने फटकेबाजी सुरूच ठेवली. तसंच, कुलदीप यादवला षटकार लगावत रोहित शर्माने IPLकारकिर्दीतील २०० षटकार पूर्ण केले. तो त्याचा डावातील सहावा षटकार होता. आयपीएलच्या कारकिर्दीत २०० षटकार लगावणारा रोहित चौथा खेळाडू ठरला. या यादीत सर्वाधिक ३२६ षटकारांसह ख्रिस गेल अव्वल, २१४ षटकारांसह डीव्हिलियर्स दुसरा तर २१२ षटकारांसह धोनी तिसरा आहे. त्यापाठोपाठ रोहितने २०० षटकारांचा टप्पा गाठला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा