Coronavirus cases in Maharashtra: 668Mumbai: 377Pune: 65Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Nagpur: 17Ahmednagar: 17Pimpri Chinchwad: 16Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Coronavirus Updates: स्वतःसह इतरांचीही काळजी घ्या; रोहितचं चाहत्यांना आवाहन

करोनावर मात करण्यासाठी सर्वांनी जागरूकपणे एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे.

Coronavirus Updates: स्वतःसह इतरांचीही काळजी घ्या; रोहितचं चाहत्यांना आवाहन
SHARE

जगभरात कोरोना व्हायरसमुळं दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देशातील सरकारी यंत्रणा या व्हायरसशी झुंज देत आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना भारतीय क्रिकेट संघाला खेळाडू हिटमॅन रोहित शर्मा यानं आपल्या चाहत्यांना स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याच आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यानं हे आवाहन केलं आहे.

'सध्याचे दिवस सर्वांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत. जगभरात करोना व्हायरसनं धूमाकूळ घातला असून, करोनावर मात करण्यासाठी सर्वांनी जागरूकपणे एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या आजुबाजुला काय चाललंय, यावर आपलं बारीक लक्ष पाहिजे. जर कोणाला या रोगाची लक्षणे दिसल्यास त्याने त्वरीत नजीकच्या रुग्णालयाला कळवलं पाहिजे’, असं रोहितनं आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

'आपलं आयुष्य धोक्यात घालून करोनाग्रस्तांवर उपचार करण्यास कार्यरत असलेले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसंच, या आजारात मृत्यूमुखी पावलेल्या कुटुंबीयांसाठी मी दुःख व्यक्त करतो’, असंही रोहितनं व्हिडीओमध्ये म्हटलं.

'कोरोना आजाराचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपययाोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही. सगळ्यांनी खंबीर आणि कणखर राहा’, असं आवाहन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरद्वारे केलं असून, करोनाविरुद्ध लढा देऊ, असंही कोहलीनं म्हटलं आहे.हेही वाचा -

Coronavirus : मुंबईत कोरोना व्हायरसचा पहिला बळी

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यापासून वीजनिर्मिती रखडणार?संबंधित विषय
संबंधित बातम्या