Advertisement

मुंबईच्या 'या' २ खेळांडुंमध्ये रंगला ‘रॉक पेपर सिझर्स’चा सामना


मुंबईच्या 'या' २ खेळांडुंमध्ये रंगला ‘रॉक पेपर सिझर्स’चा सामना
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्सनं आपला क्वारंटाइन कालावधी संपवून मुंबईच्या संघाने युएईमध्ये सरावास सुरुवात केली. याच सरावादरम्यान चाहत्यांकडून रोहित शर्माची फलंदाजी विरूद्ध जसप्रीत बुमराहची गोलंदाजी असा सामना होऊन जाऊदे अशी एक मागणी क्रिकेटप्रेमींकडून केली जात होती. या मागणीचा विचार करत अखेर मुंबई इंडियन्सने या दोन प्रतिभावंत खेळाडूंचा दमदार असा सामना घडवून आणला आणि त्यात एक खेळाडू विजयी झाला.

बहुप्रतिक्षित आयपीएलसाठी २० ऑगस्टपासूनसर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी बीसीसीआयने दिली. मुंबईचा संघही युएईला रवाना झाला असून, संघाने सरावाला सुरुवात केली आहे. या सरावादरम्यानचे अनेक फोटो ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले. त्यावेळी चाहत्यांना रोहित विरूद्ध बुमराह सामना पाहायचा होता. हा सामना शूट करून मुंबई इंडियन्स संघाने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. 

या व्हिडिओत कर्णधार रोहित आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात क्रिकेटचा नव्हे, तर चक्क ‘रॉक पेपर सिझर्स’चा सामना रंगला. खेळात दगड, कागद आणि कात्री अशा तीन गोष्टींच्या ३ खुणा असतात. दगडाने कात्री ठेचली जाऊ शकते म्हणून दगड श्रेष्ठ, कात्रीने कागद कापला जाऊ शकतो म्हणून कात्री श्रेष्ठ तर कागदाने दगडाला गुंडाळून ठेवता येऊ शकतं म्हणून दगड श्रेष्ठ अशा पद्धतीचा हा खेळ असतो. रोहित आणि बुमराहमध्ये हाच खेळ खेळला गेला. त्यात बुमराहने विजय मिळवला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा