Advertisement

मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगच्या जर्सी अनावरण सोहळ्यात रोमेश कालुवितरणाची फटकेबाजी


मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगच्या जर्सी अनावरण सोहळ्यात रोमेश कालुवितरणाची फटकेबाजी
SHARES

ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे अायोजित केल्या जाणाऱ्या साई- मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग (एमएमपीएल) टी-२० स्पर्धेत श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज रोमेश कालुवितरणाने सुरेख 'फटकेबाजी' केली. अाताच्या क्रिकेटपटूंना अापल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी अायपीएलद्वारे मिळाली अाहे. पण अाम्ही १९९६ मध्येच टी-२० सामने खेळलो अाहोत, अशा शब्दांत श्रीलंकेच्या एकेकाळचा स्फोटक फलंदाज कालुवितरणाने सर्वांनाच क्लिन बोल्ड केलं.


३३ वर्षांखालील क्रिकेटर्ससाठी ही स्पर्धा

अापल्या काळात चमकलेल्या अाणि अाता वयाची तेहतिशी अाेलांडलेल्या मुंबई अाणि उपनगरातील क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा असणार अाहे. २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत शिवाजी पार्क स्मॅशर्स, बांद्रा बस्टर्स, जुहू हिरोज, सांताक्रूझ क्रॅकर्स, बोरीवली वाॅरियर्स, चेंबूर स्ट्रायकर्स, मुलुंड मास्टर ब्लास्टर्स अाणि वरळी पिच स्मॅशर्स हे अाठ संघ एकमेकांशी झुंजणार अाहेत. या अाठही संघांच्या जर्सीचे अनावरण अाज हाॅटेल मरीन प्लाझा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात अाले.


निवृत्तीनंतर प्रशिक्षणाकडे वळलो

कुमार संगकारा हा माझ्यापेक्षाही चांगला यष्टीरक्षक असल्याचे समजल्यानंतर मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र निवृत्तीनंतरही मी क्रिकेटची सेवा करण्यात व्यग्र असून प्रशिक्षणाकडे वळलो. त्यामुळेच मी दिनेश चंडिमल, लाहिरू थिरिमाने अाणि निरोशन डिकवेला यांच्यासारखे खेळाडू घडवू शकलो. श्रीलंका अ संघाचा प्रशिक्षक असताना मी या सर्वांना मार्गदर्शन केले अाहे.


एक मोठी भागीदारी भारताला तारेल - वासिम जाफर

दक्षिण अाफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची कामगिरी चांगली झाली नाही. मात्र त्याचा दोष खेळाडूंना नव्हे तर खेळपट्टीला द्यायला हवा. एक मोठी भागीदारी भारतीय संघाला या मालिकेत पुन्हा वरच्या स्थानी अाणून ठेवेल. केपटाऊनपेक्षा सेंच्युरियन येथील खेळपट्टी चांगली असून या कसोटीत भारतीय संघानं कमबॅक केलं अाहे, असं रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अाणि नुकतंच विदर्भच्या रणजी अजिंक्यपदात मोलाचा वाटा उचललेल्या वासिम जाफरनं सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा