Advertisement

दिल्ली व मुंबईत रंगणार अंतिम सामना; सचिनचा 'मुंबई'ला सल्ला


दिल्ली व मुंबईत रंगणार अंतिम सामना; सचिनचा 'मुंबई'ला सल्ला
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामातील अंतिम सामना मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) यांच्यात रंगणार आहे. आयपीएलच्या (ipl 2020) इतिहासात पहिल्यांदाच दिल्ली अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात दिल्लीसमोर ४ वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळालेल्या मुंबई इंडियन्सचं (mumbai indinas) आव्हान आहे. अवघ्या काहीच तासात आयपीएलच्या १३ व्या हंगामाचा निकाल लागणार आहे. त्यामुळं आयपीएल कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई व दिल्लीच्या सामन्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यानं मुंबईच्या संघाला एक मोलाचा सल्ला दिला आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत सचिननं 'मुंबईसाठी तुम्ही जेव्हा मैदानावर खेळायला उतरता तेव्हा तुम्ही केवळ एक व्यक्ती नसता, तर संपूर्ण उर्जेचा समूह असता. सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचा संघ म्हणजे एक कुटुंब आहे. आयपीएलसारख्या स्पर्धेचा वेग हा प्रचंड असतो. अशा वेगवान स्पर्धेत अनेक अडथळे आणि आव्हानं असतात. पण संघाच्या चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आपण सगळे एकमेकांच्या सोबत असतो. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून खेळा', असा सल्ला दिला आहे.

'अंतिम फेरीसारख्या महत्त्वाच्या प्रसंगात सगळ्यांनी एकसंध राहण्याची गरज आहे. तुम्ही सारे हे नक्कीच करू शकाल. संघाच्या मालकांपासून ते सहाय्यक कर्मचारी वर्गापर्यंत सारेच तुम्हाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळं सामन्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे', असंही सचिननं म्हटलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा