Advertisement

‘क्रिकेटच्या देवा’कडून दीपक चहरची स्तुती


‘क्रिकेटच्या देवा’कडून दीपक चहरची स्तुती
SHARES

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात झालेल्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताचा जलद गोलंदाज दीपक चहरनं हॅट्रिक घेतली. दीपकनं १८ व्या षचकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिला गडी बाद केला. त्यानंतर सामन्याच्या अखेरच्या म्हणजे २० वा षटकाच्या पहिल्या २ चेंडुंवर २ गडी बाद केले. त्यांच्या अशा हॅट्रिकच्या जोरावर भारतानं ३ सामन्यांची मालिका २-१ नं जिंकली. मात्र दीपकच्या या हॅट्रिकची 'क्रिकेटच्या देवा'नं म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं स्तुती केली आहे.

अप्रतिम गोलंदाजी

‘दीपकची गोलंदाजी अप्रतिम होती. त्यानं खूप चतुराईनं आणि विविधतेनं गोलंदाजी करत मोक्याच्या क्षणी बांग्लादेशचे गडी बाद केले. शिवम दुबे, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनीही निर्णायक सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली’, असे ट्विट सचिन तेंडुलकरनं केलं.

१७५ धावांचं आव्हान

या सामन्यात बांग्लादेशनं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं प्रथम गोलंदाजी करत भारतानं १७५ धावांचं आव्हान बांग्लादेशसमोर ठेवलं. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाले. पण त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीनं संघाचा डाव सावरला.


७ धावा ६ बळी

या सामन्यात दीपक चहरनं त्याच्या ३.२ षटकांमध्ये केवळ ७ धावा दिल्या आणि तब्बल ६ बळी टिपले. त्यात त्यानं एक हॅट्रिक घेतली. त्याचसोबत त्याने टी २० इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.



हेही वाचा -

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आता लागणार 'एवढे' दिवस

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे आमदार जयपूरहून मुंबईकडे रवाना ?



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा