Advertisement

चेंबूर स्ट्रायकर्सने मिळवला एमएमपीएलमध्ये पहिला विजय


चेंबूर स्ट्रायकर्सने मिळवला एमएमपीएलमध्ये पहिला विजय
SHARES

साई मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगच्या उद्घाटनाच्या सामन्यात वरळी पिच स्मॅशर्सकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर चेंबूर स्ट्रायकर्स संघाला मात्र दुसऱ्या सामन्यात सूर गवसला. अादित्य खानोलकरच्या दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे चेंबूर स्ट्रायकर्सने मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर रंगलेल्या सामन्यात वांद्रे बस्टर्सचा २६ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात अप्रतिम कामगिरी करत चेंबूरने १५ षटकांत ७ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. हे अाव्हान पार करताना वांद्रे बस्टर्सने कडवी लढत दिली. पण त्यांना विजयासाठी २६ धावा कमी पडल्या.


अादित्य खानोलकरची पुन्हा धडाकेबाज फलंदाजी

पंकज असरानी (३८) अाणि दिग्विजय सिंग (१३) यांनी चेंबूर स्ट्रायकर्सला चांगली सुरुवात करून दिल्यानंतर विनय सिंग अाणि अादित्य खानोलकर यांनी धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत चेंबूरला सुस्थितीत अाणून ठेवले. अादित्य अाणि विनय यांनी अाक्रमक फलंदाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. विनयने ३० चेंडूंत ४५ तर अादित्यने १८ चेंडूंत ४० धावांची धुव्वाधार खेळी साकारली. वांद्रे बस्टर्सकडून रोशन अादे याने तीन विकेट्स मिळवल्या.



वांद्रे बस्टर्सचे तोडीस तोड उत्तर

चेंबूरने विजयासाठी ठेवलेले २१५ धावांचे लक्ष्य गाठताना वांद्रे बस्टर्सनेही तोडीस तोड उत्तर दिले. अल्ताफ बशीर (३४), रोशन अदे (४६), धीरज सोलंकी (३६) अाणि सुनील सांगळे (४१) यांनी सुरेख फलंदाजी करत वांद्रे बस्टर्सच्या विजयाच्या अाशा कायम ठेवल्या. मात्र अपेक्षित सरासरी राखता न अाल्यामुळे त्यांना १५ षटकांत १८८ धावांपर्यंतच मजल मारता अाली.


सर्वोत्तम फलंदाज – रोशन अदे (४६, वांद्रे बस्टर्स)
सर्वोत्तम गोलंदाज – रोशन अदे (३-३४, वांद्रे बस्टर्स)
सामनावीर – अादित्य खानोलकर (४० धावा अाणि २ विकेट्स, चेंबूर स्ट्रायकर्स)


हेही वाचा - 

शिवाजी पार्कची 'सुपरस्टार' कामगिरी, मुलुंड मास्टरब्लास्टरवर 41 धावांनी विजय


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा