Advertisement

साई एमएमपीएलमध्ये 'वरळी पिच स्मॅशर्स'ची दमदार सलामी

साई मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगमध्ये वरळी पिच स्मॅशर्स संघाने चेंबूर स्ट्रायकर्सचा ७ विकेट्सनी सहज धुव्वा उडवत दमदार सलामी दिली. अश्विन अरोराच्या भेदक बाॅलिंगच्या जोरावर चेंबूर स्ट्रायकर्सचा डाव १८.३ षटकांत गुंडाळला. त्यानंतर राजू गोवेकर आणि हर्षद कोहली यांच्या दमदार बॅटींगच्या जोरावर वरळी पिच स्मॅशर्सने ३ विकेट्स गमावत १५३ धावांचं आव्हान लिलया पार केलं आणि पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली.

साई एमएमपीएलमध्ये 'वरळी पिच स्मॅशर्स'ची दमदार सलामी
SHARES

मरीन ड्राइव्ह येथील पोलिस जिमखाना मैदानावर सुरू झालेल्या साई मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगमध्ये वरळी पिच स्मॅशर्स संघाने चेंबूर स्ट्रायकर्सचा ७ विकेट्सनी सहज धुव्वा उडवत दमदार सलामी दिली. अश्विन अरोराच्या भेदक बाॅलिंगच्या जोरावर चेंबूर स्ट्रायकर्सचा डाव १८.३ षटकांत गुंडाळला. त्यानंतर राजू गोवेकर आणि हर्षद कोहली यांच्या दमदार बॅटींगच्या जोरावर वरळी पिच स्मॅशर्सने ३ विकेट्स गमावत १५३ धावांचं आव्हान लिलया पार केलं आणि पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली.


अश्विनच्या बाॅलिंगपुढं चेंबूर स्ट्रायकर्स नतमस्तक

आयपीएलच्या धर्तीवर प्रकाशझोतात खेळवण्यात आलेल्या या मॅचमध्ये वरळी पिच स्मॅशर्सने टाॅस जिंकून पहिली बाॅलिंग करण्याचा निर्णय घेतला. राजू गोवेकर आणि अश्विन अरोरा यांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. अजॉय सिंग आणि राजू गोवेकर यांनी चेंबूर स्ट्रायकर्सच्या प्रत्येकी २ बॅट्समन्सना तंबूचा रस्ता दाखवल्यामुळे चेंबूरचा संघ अडचणीत सापडला होता.

पण आदित्य खांडलकर नावाचं वादळ घोंघावलं. आदित्यने २७ चेंडूंत १२ फाेर आणि ३ सिक्सरची आतषबाजी करत वरळीच्या बाॅलर्सची धुलाई केली. त्याने ७० धावा फटकावल्या. पण अश्विन अरोराच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर त्याने ५ बॅटमन्सना माघारी पाठवत चेंबूर स्ट्रायकर्सचा डाव १५२ धावांवर संपुष्टात आणला.


गोवेकर, कोहलीची शतकी भागीदारी

चेंबूर स्ट्रायकर्सने विजयासाठी ठेवलेलं १५३ धावांचं आव्हान पार करताना वरळी पिच स्मॅशर्सची सुरुवात खराब झाली. ओपनर स्टीव्हन जोसेफला (१३) मोठी खेळी करण्यात अपयश आलं. आदित्य खांडलकरने त्याचा त्रिफळा उडवला. पण राजू गोवेकर आणि हर्षद कोहली यांनी जबरदस्त खेळीचं प्रदर्शन करत वरळीला विजयासमीप आणून ठेवलं. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी रचली.

हर्षद कोहलीची खेळी मयांक दायलने संपुष्टात आणली. त्याने ३१ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांनिशी ४९ धावा कुटल्या. त्यानंतर राजू गोवेकरने एका बाजूने किल्ला लढवत वरळी पिच स्मॅशर्सला सहज विजय मिळवून दिला. मात्र ५ विकेट्स मिळवणाऱ्या अश्विन अरोराला सामनीवार म्हणून गौरवण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा