Advertisement

IPL 2020: शुक्रवारी जाहीर होणार आयपीएलचं वेळापत्रक

आयपीएल प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल शुक्रवारी दुबईत वेळापत्रक जाहीर करणार आहेत.

IPL 2020: शुक्रवारी जाहीर होणार आयपीएलचं वेळापत्रक
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) खेळवण्यात येणार आहे. सर्व संघ यूएईमध्ये दाखलही झाले आहेत. स्पर्धा १६ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. आयपीएल २०२० या स्पर्धेचं वेळापत्रक शुक्रवारी जाहीर होईल, अशी माहिती सौरव गांगुली यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

'वेळापत्रकाला उशीर झाला आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. प्रस्तावित वेळापत्रकातील समस्यांचे निराकरण करून त्याला अंतिम स्वरूप दिलं असल्याची माहिती गांगुलीने दिली. आयपीएल प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल शुक्रवारी दुबईत वेळापत्रक जाहीर करणार आहेत.

१३ व्या सत्राचं वेळापत्रक तयार करताना बीसीसीआयला काही अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. कोरोना व्हायरससोबतच यूएईमधील उष्म वातावरणाचा खेळाडूवर होणारा परिणामाबद्दलही विचार करावा लागणार आहे. येथील उष्म वातावरणामुळे खेळाडूंनी दुपारी सराव न करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयला वेळापत्रक बनवायला वेळ लागल्याचे म्हटले जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा