Advertisement

श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनची कर्णधारपदी निवड

कोरोना संकटामुळे सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनची कर्णधारपदी निवड
SHARES

पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात ३ एकदिवशीय सामने आणि ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. १३ जुलै ते २५ जुलै या कालावधीत हे सामने होणार आहेत.  

कोरोना संकटामुळे सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नवीन आणि युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवन कर्णधार असेल. 

या दौऱ्यासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, चेतन साकरिया, के गौतम या आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

श्रीलंका दौरा सुरु असताना भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. भारत १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठीचा भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक

वनडे मालिका 

१३ जुलै – पहिला वनडे सामना

१६ जुलै – दुसरा वनडे सामना

१८ जुलै – तिसरा वनडे सामना

टी-२० मालिका 

२१ जुलै – पहिला टी-२० सामना

२३ जुलै – दुसरा टी-२० सामना

२५ जुलै – तिसरा टी-२० सामना



हेही वाचा -

BCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या

पुढील १० वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा