Advertisement

पुढील १० वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन

पुढील १० वर्षांत आयसीसीच्या २९ स्पर्धांचे आयोजन होणार आहे.

पुढील १० वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन
SHARES

पुढील १० वर्षांत आयसीसीच्या २९ स्पर्धांचे आयोजन होणार आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या एफटीपीनुसार २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ८-८ स्पर्धांचे आयोजन होणार आहे. २०२७ च्या वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश असणार आहे.

२००३ नंतर प्रथमच सुपर सिक्स फाॅर्मेटमध्ये सामने खेळविले जातील. २०१८ ला रद्द झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा सुरू होणार असून, आघाडीचे ८ संघ स्पर्धेत सहभागी होतील. २००५ आणि २०२९ ला ही स्पर्धा होईल. टी-२० विश्वचषकासाठी सहभागी संघांची संख्या २० करण्यात आली आहे. यंदा भारतात टी-२० विश्वचषक आयोजित होत असून, २०२२ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान

  • दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.
  • आयसीसीच्या भविष्यकालीन दौरा कार्यक्रमानुसार २०२४ ते २०३१ अशा कालावधीतील दरवर्षी टी-२० विश्वचषक, वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामने खेळले जातील.
  • यंदाच्या टी-२० विश्वचषकापासून उभय संघांत सामना पाहायला मिळणार आहे.

महिला एफटीपी वेळापत्रक

वर्ष
स्पर्धा
संघ
सामने
२०२४     
टी-२० विश्वचषक
१०     
२३
२०२५     
वन डे विश्वचषक
८     
३१
२०२६    
 टी-२० विश्वचषक
१२     
३३
२०२७     
चॅम्पियन्स ट्रॉफी
६     
१६
२०२८     
टी-२० विश्वचषक
१२     
३३
२०२९
वन डे विश्वचषक
१०     
४८
२०३०     
टी-२० विश्वचषक    
 १२     
३३
२०३१     
चॅम्पियन्स ट्रॉफी     
६     
१६


पुरुष एफटीपी वेळापत्रक

वर्ष     
स्पर्धा    
संघ     
सामने
२०२४
टी-२० विश्वचषक     
२०     
५५
२०२५
चॅम्पियन्स ट्रॉफी     
८     
१५
२०२५
डब्ल्यूटीसी फायनल
२     

२०२६
टी-२० विश्वचषक
२०     
५५
२०२७
 वन डे विश्वचषक 
१४     
५४
२०२७
डब्ल्यूटीसी फायनल
२     

२०२९
टी-२० विश्वचषक 
२०    
 ५५
२०२९
चॅम्पियन्स ट्रॉफी 

१५
२०२९
डब्ल्यूटीसी फायनल

 १
२०३०
टी-२० विश्वचषक
२०     
५५
२०३१
वन डे विश्वचषक
१४     
५४
२०३१
डब्ल्यूटीसी फायनल 
२    हेही वाचा -

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा