Advertisement

दिव्यांग क्रिकेट : दक्षिण विभागाचे दोन्ही सामन्यात विजय


दिव्यांग क्रिकेट : दक्षिण विभागाचे दोन्ही सामन्यात विजय
SHARES

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिव्यांग क्रिकेटपटूंचा खेळ पाहून मुंबईकर थक्क झाले. आठव्या आंतरविभागीय एलआयसी चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागाने नूर उल हुडाच्या दमदार खेळाच्या जोरावर दोन्ही सामन्यात दणदणीत विजय नोंदवले. पूर्व विभागाला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अन्य सामन्यात, पश्चिम आणि उत्तर विभागाने आपल्या विजयाचे खाते उघडण्यात यश मिळवले.


नूर उल हुडाची सुरेख कामगिरी

आजपासून मुंबईच्या पोलीस जिमखान्यावर सुरू झालेल्या दिव्यांगांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुब्बारावच्या अप्रतिम फिरकीच्या बळावर पूर्व विभागाला २० षटकांत १११ धावांपर्यंत मजल मारता अाली. १३ षटकात ६ बाद ५३ अशी बिकट अवस्था असताना अभिजीत बिस्वासने ४६ धावा चोपून काढत पूर्व विभागाचा डाव सावरला. हे अाव्हान पार करताना नूर उल हुडाने झंझावाती खेळी केली. त्याने ३५ चेंडूत ४६ धावा करताना ३ चौकार आणि ४ खणखणीत षटकार खेचले. दक्षिण विभागाने 14 व्या षटकांतच आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


दुसऱ्या सामन्यातही हुडाची चमक

दक्षिण विभागाने आपल्या दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवला. मध्य विभागाने विजयासाठी ठेवलेले १२५ धावांचे आव्हान दक्षिण विभागाने दोन फलंदाजांच्या बदल्यात अकराव्या षटकांतच गाठले. या विजयातही हुडाची नाबाद ५३ धावांची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने मंजुनाथसह तिसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची अभेद्य भागी रचली.


हेही वाचा -

दिव्यांगांच्या राष्ट्रीय क्रिकेटचा थरार पोलीस जिमखान्यावर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा