Advertisement

आयपीएलमध्ये 'या' निर्णयासाठी विशेष पंच

यंदाच्या हंगामात 'नो बॉल'चा पुन्हा उद्भवू नये यासाठी या स्पर्धेमध्ये फक्त ‘नोबॉल’वर लक्ष ठेवण्यासाठी खास पंचांची नेमणूक केली जाणार आहे.

आयपीएलमध्ये 'या' निर्णयासाठी विशेष पंच
SHARES

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पंच आणि खेळाडू यांच्यातील वाद नेहमीच पाहायला मिळतात. अनेकदा सामना विजयाच्या दिशेनं आला असताना पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळं सामना हातातून निसटल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळं सामना संपल्यानंतर पंचांच्या सदोष कामगिरीवर टीका होते. आयपीएलच्या १२ व्या हंगामात 'नो बॉल' वरून पंच आणि खेळाडूमध्ये मोठा वाद झाला होता. त्यावेळी हा वाद खूपच टोकाला गेला होता. त्यामुळं यंदाच्या हंगामात 'नो बॉल'चा पुन्हा उद्भवू नये यासाठी या स्पर्धेमध्ये फक्त ‘नोबॉल’वर लक्ष ठेवण्यासाठी खास पंचांची नेमणूक केली जाणार आहे.


खास पंच

'नो बॉल'साठी खास पंच या निर्णयाबाबत आयपीएलचे गव्हर्निंग कौन्सिल यासाठी योजना आखत असून सगळं सुरळीत जुळून आल्यास पुढील आयपीएलमध्ये क्रिकेटप्रेमींना 'नो बॉल' पंच बघायला मिळेल. मुंबईत झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद नवे अध्यक्ष माजी कसोटीपटू ब्रिजेश पटेल यांनी भूषविले. आयपीएलचे वेळापत्रक आखण्याआधी त्यादरम्यानच्या क्रिकेट स्पर्धा, परदेशी खेळाडूंची उपलब्धता, भारतीय संघाच्या स्पर्धा यावर या बैठकीत विचार झाला. तशी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा - रोहीत शर्मा करणार टी -२० मध्ये नवा विक्रम

वेगवेगळे पंच

मागील काही वर्षांत पंचांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातं आहे. त्याबाबत चर्चा करताना 'नोबॉल'साठी विशेष पंचाच्या नेमणूकीची संकल्पना सूचली. नेहमीचे पंच, तिसरे आणि चौथे पंच यांच्यासह नोबॉलसाठी पंच असे वेगवेगळे पंच असणार असल्याची माहिती मिळते.हेही वाचा -

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचं मौन, राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पाऊल?

राज ठाकरेंना झाला 'हा' आजारसंबंधित विषय
Advertisement