आयपीएलच्या १३ व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला लिलाव

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव वर्षाच्या अखेरीस होणार आहे

SHARE

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव वर्षाच्या अखेरीस होणार आहे. १९ डिसेंबर रोजी कोलकाता इथं हा लिलाव होणार असल्याचं आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने स्पष्ट केलं. एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पहिल्यांदाच कोलकात्यात लिलाव होणार आहे.

हेही वाचा - वनडेत २५-२५ षटकांचे २ डाव करा, सचिनचा आयसीसीला सल्ला

खेळाडूंचा लिलाव

आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव साधारणपणे बेंगळूरु इथं होत असतो. परंतु, यंदा कोलकातामध्ये करण्यात येणार आहे. २०१९च्या मोसमासाठी फ्रँचायझींना खेळाडू विकत घेण्यासाठी ८२ कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती. २०२०च्या मोसमासाठी ही मर्यादा आता ८५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.

हेही वाचा - हॅप्पी बर्थडे विराट...


शिल्लक रक्कम

फ्रँचायझींना गेल्या मोसमातील शिल्लक रक्कम या मोसमात खर्च करता येणार आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक ८.२ कोटी रुपयांची, राजस्थान रॉयल्सकडे ७.१५ कोटी रुपयांची तर कोलकाता नाइट रायडर्सकडं ६.०५ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. चेन्नई सुपर किंग्ज (३.२ कोटी रुपये), किंग्स इलेव्हन पंजाब (३.७ कोटी रुपये), मुंबई इंडियन्स (३.५५ कोटी रुपये), रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (१.८० कोटी रुपये) आणि सनरायजर्स हैदराबाद (५.३० कोटी रुपये) यांनाही उर्वरित रक्कम खर्च करता येणार आहे.हेही वाचा -

अनधिकृतपणे रेल्वे तिकीटांची विक्री करणाऱ्यांवर मध्य रेल्वेची कारवाई

२०१८-१९ या आर्थिक वर्षात रेल्वे बिघाडात 'इतकी' वाढसंबंधित विषय
ताज्या बातम्या