राज ठाकरे 'ह्या' दुखण्याने त्रस्त

मनसेच्या MNS Adhikrut या अधिकृत ट्विटर अकाऊंटमधून ट्विट केलेल्या फोटोंमधून राज यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे.

SHARE

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील महिनाभरापासून हाताच्या दुखण्याने त्रस्त आहेत. मनसेच्या MNS Adhikrut या अधिकृत ट्विटर अकाऊंटमधून ट्विट केलेल्या फोटोंमधून त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांना टेनिस एल्बो झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी गुरूवारी कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळचे फोटो MNS Adhikrut ने ट्विट केले आहेत. या फोटोत राज यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचं दिसून आलं. राज यांना टेनिस एल्बो झाला असून गेल्या महिन्याभरापासून त्यांना या आजाराचा त्रास होत आहे.  भारत भालके यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेटली.

हाताच्या कोपराचे स्नायू सुजले तर हा आजार होतो. यामध्ये हाताला तीव्र वेदना होतात. कपडे पिळणं, दरवाजा उघडणं किंवा दरवाजाचा नॉब फिरवणं या साध्या हालचालींमध्येही वेदना होतात. टेनिस किंवा बॅडमिंटन खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. यालाच टेनिस एल्बो असं म्हणतात.हेही वाचा -

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचं मौन, राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पाऊल?

मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम, आमदारांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय
संबंधित विषय
ताज्या बातम्या