रोहीत शर्मा करणार टी -२० मध्ये नवा विक्रम

७ नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी -२० सामन्यात रोहीत शर्मा नवीन विक्रम करणार आहे.

SHARE

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आता एक नवीन विक्रम करणार आहे. रोहित ७ नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध आपला १०० वा आंतरराष्ट्रीय टी -२० सामना खेळणार आहे. १०० आंतरराष्ट्रीय  टी -२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू तर जागतिक स्तरावरील तो दुसरा क्रिकेपटू ठरणार आहे.

राजकोटमध्ये गुरूवारी ७ नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध टी -२० सामना होणार आहे. रोहित शर्माचा १०० वा आंतरराष्ट्रीय टी -२० सामना असणार आहे. याआधी कोणत्याच्या भारतीय क्रिकेटपटूने एवढे आंतरराष्ट्रीय टी -२० सामने खेळले नाहीत. पाकिस्तानचा शोएब मलिक हा १०० आंतरराष्ट्रीय टी -२० सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे. शोएबने आतापर्यंत १११ सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. दोघांनी प्रत्येकी ९९ सामने खेळले आहेत.

तिसऱ्या स्थानावर महेंद्रसिंग धोनी असून त्याने  ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर सुरेश रैना (७८) आणि कर्णधार विराट कोहली (७२) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी -२० सर्वाधिक धावा करण्यामध्ये रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. रोहितने ९९ सामन्यात २,४५२ धावा केल्या आहेत. तसंच रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०६ षटकार ठोकले आहेत. या व्यतिरिक्त त्याने सर्वाधिक चार शतकही झळकावले आहेत. हेही वाचा  -
यंदाही आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द
आयपीएलच्या १३ व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला लिलाव 
संबंधित विषय
ताज्या बातम्या