Advertisement

अबब! टीम इंडियाच्या एका सामन्यासाठी स्टार स्पोर्टस मोजणार ६० कोटी


अबब! टीम इंडियाच्या एका सामन्यासाठी स्टार स्पोर्टस मोजणार ६० कोटी
SHARES

टीम इंडियाच्या जगभरातील सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क विकत घेण्यासाठी जियो (रिलायन्स), स्टार इंडिया अाणि सोनी या तीन कंपन्यांमध्ये जणू युद्धच रंगलं होतं. अखेर स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं तब्बल ६१३८.१ कोटी रुपयांची बोली लावत २०१८ ते २०२३ पर्यंत टीम इंडियाच्या सर्व सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवले. म्हणजेच भारतीय संघाच्या एका सामन्यासाठी स्टार स्पोर्टसला तब्बल ६०.१ कोटी रुपये मोजावे लागणार अाहेत.



स्टार स्पोर्टसची मक्तेदारी

बीसीसीअायकडून भारतीय संघाचे हक्क मिळवितानाच, स्टार इंडियाने जणू क्रिकेटमध्ये अापली मक्तेदारीच सिद्ध केली अाहे. याअाधी स्टार स्पोर्टसने १६,३४७ कोटी रुपये मोजून अायपीएलचे हक्क अापल्या पदरात पाडून घेतले होते. त्याचबरोबर स्टार स्पोर्टसकडे अायसीसीच्या स्पर्धांचे (पुरुष अाणि महिलांचा विश्वचषक तसेच टी-२० वर्ल्डकप) हक्क अाहेत.


तीन दिवस रंगली बोली

भारतीय संघाच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळविण्यासाठी जवळपास तीन दिवस बोली प्रक्रिया रंगली होती. पहिल्याच दिवशी ४४४२ कोटी रुपयांची बोली लावण्यात अाली होती. बुधवारी हा अाकडा ६००० कोटींच्या पलीकडे गेला होता. अखेर स्टार स्पोर्टसने ६१३८.१ कोटी रुपयांना हे हक्क विकत घेतले. याअाधी त्यांनी २०१२-२०१८ पर्यंतचे हक्क ३८५१ कोटी रुपयांना विकत घेतले होते. 



सहा कंपन्या होत्या शर्यतीत

भारतीय संघाच्या १०२ सामन्यांचे हक्क विकत घेण्यासाठी फेसबुक, गुगल यांसह सहा कंपन्या शर्यतीत होत्या. छाननीअखेर स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अाणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्याच अाॅनलाइन बोलीसाठी पात्र ठरल्या होत्या.


हेही वाचा -

अायपीएलमुळे बीसीसीअायची झाली 'इतकी' कमाई

बीसीसीअायचं मुंबईतील मुख्यालय बंगळुरूला हलणार?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा