Advertisement

ऑस्ट्रेलियाचा 'सुपर' निर्णय, निकाल लागेपर्यंत मॅच सुरूच राहणार

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत एक सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार असल्याचा नवा नियम बनविला आहे.

ऑस्ट्रेलियाचा 'सुपर' निर्णय, निकाल लागेपर्यंत मॅच सुरूच राहणार
SHARES

विश्वचषक २०१९ या स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला. त्यावेळी या दोन्ही संघामध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र, सुपर ओव्हरमध्येही इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोनिही संघाची धावसंख्या समान होती. त्यामुळं अनिर्णित राहिलेल्या मुळ सामन्यात चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आलं.

आयसीसीवर टीका

इंग्लंडला विश्वविजेता ठरवल्यानं ICC च्या या नियमाबाबत त्यांच्यावर खूप टीका करण्यात आली. त्यामुळं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एखाद्या सामन्यात सुपर ओव्हर झाल्यास तोही सामना अनिर्णित राहिला तर, यावर उपाय म्हणून पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत एक सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार असल्याचा नवा नियम बनविला आहे.

सामना अनिर्णित

या नव्या नियमाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मंगळवारी माहिती दिली आहे. जर २ संघांमधील सामना अनिर्णित राहिला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. ही सुपर ओव्हर जर अनिर्णित राहिली, तर एक संघ स्पष्ट विजेतेपद मिळवेपर्यंत सुपर ओव्हरचा खेळ सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं.


२ संघांना गुण विभागून

पुरूष आणि महिला अशा दोन्ही बिग बॅश लीग स्पर्धांमध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहे. मात्र साखळी सामन्यात सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास २ संघांना गुण विभागून देण्यात येणार आहेत.हेही वाचा -

एमआयएमची पहिली यादी जाहीर, 'हे' आहेत मुंबईतील ५ उमेदवार

धक्कादायक! PMC बँकेवर आर्थिक निर्बंध, खातेधारकांना एवढीच रक्कम काढता येणारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा