Advertisement

सूर्यकुमार यादवची इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० संघात निवड

मागील चार वर्षांपासून भारतीय संघाचे दार ठोठावणाऱ्या सूर्यकुमार यादवसाठी अखेर भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत.

सूर्यकुमार यादवची इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० संघात निवड
SHARES

मागील चार वर्षांपासून भारतीय संघाचे दार ठोठावणाऱ्या सूर्यकुमार यादवसाठी अखेर भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याची टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन आणि राहुल तेवतिया यांचाही समावेश करण्यात आला आहे.  

 या मालिकेचे पाचही सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर खेळण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून ही मालिका सुरू होत आहे. मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आयपीएलच्या १३ व्या हंगामात धडाकेबाज कामगिरी केली होती. मागील तीन-चार वर्षांपासून त्यांची आयपीएलमधील कामगिरी जबरदस्त आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने धावांचा रतीब घातला आहे.    

गेल्यावर्षी आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव फॉर्मात होता. त्याची भारतीय संघात निवड होईल, असे सर्वांना वाटले होते. मात्र त्यावेळी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कर्णधार विराट कोहलीला चांगलेच ट्रोल केले होते.

 टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, शिखर धवन, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, वाय. चहल, वरुण चक्रवर्थ्य, अक्षर पटेल, डब्लू. सुंदर , आर. तेवतीया, टी.नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप, शार्दुल ठाकूर.हेही वाचा -

IND Vs ENG : तिसरा एकदिवसीय सामना मुंबईत होणार?

IPL Auction 2021: जाणून घ्या कोणत्या संघाला कोणाला स्थान?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा