आयपीएलमध्ये कॅच घ्या, SUV कार जिंका!

आयपीएलच्या १२ व्या हंगामात जो कॅच सर्वोत्कृष्ट असेल त्या प्रेक्षकाला टाटाची हॅरियर एसयुव्ही मिळणार आहे.

SHARE

यंदाच्या इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) च्या सामन्यात फलंदाजाने मारलेल्या षटकाराचा एका हातात झेल (कॅच) घेतल्यास प्रेक्षकाला एक लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तसंच, आयपीएलच्या १२ व्या हंगामात जो कॅच सर्वोत्कृष्ट असेल त्या प्रेक्षकाला टाटाची हॅरियर एसयुव्ही मिळणार आहे. 


प्रेक्षकांमध्ये स्पर्धा

आयपीएलच्या मागील ११ सिझनमध्ये फलंदाजाने मारलेल्या षटकाराचा स्टेडीअममध्ये बसलेल्या अनेक प्रेक्षकांनी एका हातात झेल घेतला आहे. त्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. यंदाच्या हंगामात टाटानं प्रेक्षकांसाठी हॅरिअर कॅच स्पर्धेचं आयोजन केलं आहे. जो प्रेक्षक एका हातात कॅच पकडेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंप्रमाणे प्रेक्षकांमध्ये देखील स्पर्धा पाहायला मिळणार आहे.


लीड ब्रॅंड

सोमवारी बीसीसीआयने इंडियन प्रिमियर लीगचे अधिकृत पार्टनर टाटा मोटर्सच्या टाटा हॅरिअर एसयूवीला आयपीएल-२०१९ चा लीड ब्रॅँड म्हणून घोषित केले आहे. यंदाच्या आयपीएलच्या बाराव्या हंगामाला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळं या संपूर्ण हंगामात सर्वोत्कृष्ठ कॅच कोण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या