Advertisement

'त्या' सुफरफॅन आजीचं निधन


'त्या' सुफरफॅन आजीचं निधन
SHARES

वर्ल्ड कप २०१९मधील भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यावेळी इंग्लंडमधील मैदानात भारतीय संघाच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळी या चाहत्यांमध्ये एका ८७ वर्षीय चारुलता पटेल नावाच्या आजीनी देखील उपस्थिती दर्शवली होती. वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी चारुतला या स्टेडियमवर आल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनीही त्यांची भेट घेतली होती. एका क्षणात संपूर्ण जागाचं लक्ष वेधलेल्या या आजीचं निधन झालं आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ८७ वर्षीय चारुलता पटेल या आजीनं सर्वांचं लक्ष वेधलं. त्यांचा उत्साह पाहून कोहली आणि रोहित शर्मा यांनाही त्यांची भेट घेण्याची उत्सुकता झाली होती. त्यावेळी सामन्यानंतर त्यांनी आजीची भेट घेतली व त्यांचा आशीर्वाद घेतला. कोहलीनं चारुलता पटेल यांना पुढील सामन्याचं तिकीट देण्याचं कबुल केलं होतं आणि कोहलीनं त्याचा शब्दही पाळला.

श्रीलंकेविरुद्धच्या लढतीचं तिकीट कोहलीनं आजीला दिलं. त्यामुळं पुन्हा एकदा त्याच उत्साहात आजी भारतीय संघाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. त्या सामन्यानंतर सोशल मीडियावर चारुलता पटेल यांची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. त्यावेळी या वयात स्टेडीयममध्ये बसून सामना बघण्याचा त्यांचा उत्साह पाहता विराट कोहली व रोहित शर्मा हे दोघंही अवाक झाले होते.

भारतीय संघासह जगातील क्रिकेटप्रेमींच लक्ष वेधलेल्या या सुपरफॅन आजीचं सोमवारी निधन झालं. चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीनं ही बातमी दिली. तसंच, 'तुम्हाला कळवण्यात दुःख होतं की, आमच्या आजीनं १३ जानेवारी संध्याकाळी ५.३० वाजता अखेरचा श्वास घेतला', असं लिहीलं आहे.
View this post on Instagram

Moments #INDvBAN 🏏 #WorldCup2019 Also would like to thank all our fans for all the love and support and especially #CharulataPatel ji. She's 87 and probably one of the most passionate and dedicated fans I've ever seen. Age is just a number, passion takes you leaps and bounds. There was only love and blessings for the whole team in her eyes. What an inspiration. With her blessings, on to the next one. 🙏🏼😇🙏😇 - Virat Kohli 📲 Promoted by - #youthbarodian #barodagoogle #vadodaramirror 📲👨🏻‍💻 Follow Us For Barodian Latest Updates 👇🏻✅ 🔹WhatsApp - http://bit.ly/YBWhatsApp 🔹 Instagram - http://bit.ly/YBInstagram 🔹 Facebook - http://bit.ly/YBonFacebook 🔺 For Advertisements - 7046222217 / 47 or DM

A post shared by VadodaraMirror.com (@vadodaramirror) on

गतवर्षी वर्ल्ड कप २०१९ चं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं. भारतीय संघानं चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत मजल मारली. परंतु, उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला परावभ स्विकारावा लागला.हेही वाचा -

शब्द मागे घ्या, काँग्रेस नेते राऊतांवर भडकले

अवजड वाहनांविरोधात १० महिन्यांत 'इतक्या' तक्रारीRead this story in English
संबंधित विषय
Advertisement