Advertisement

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय

चेन्नईच्याच मैदानावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताचा २२७ धावांनी पराभव केला होता. आता त्याच मैदानावर भारताने विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय
SHARES

चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १६४ धावांवर आटोपला. 

चेन्नईच्याच मैदानावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताचा २२७ धावांनी पराभव केला होता. आता त्याच मैदानावर भारताने विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. चौथ्या दिवसाची सुरूवात झाली तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज होती आणि भारताला  ७ विकेट हव्या होत्या.

भारतीय गोलंदाजांनी  इंग्लंड संघाला फिरकीची कमाल दाखवून दिली. इंग्लंडने सोमवारच्या ३ बाद ५४ धावसंख्यवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. इंग्लंडला अश्विनने चौथ्या दिवशी पहिला धक्का दिला. त्याने लॉरेन्सला २६ वर बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्सला ८ धावांवर बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. 

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तर भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर  आर अश्विनने ३ तर कुलदीप यादवने २ विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे



हेही वाचा -

IPL 2021 Auction : लिलाव प्रक्रियेत अर्जुन तेंडुलकरसह २९२ खेळाडू



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा