Advertisement

पृथ्वी शाॅला शतकाची हुलकावणी, मुंबईचा बडोदावर सहज विजय


पृथ्वी शाॅला शतकाची हुलकावणी, मुंबईचा बडोदावर सहज विजय
SHARES

मुंबई संघाने यंदाच्या मोसमाची सुरुवात शानदार केली अाहे. विजय हजारे ट्राॅफी या राष्ट्रीय वनडे अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईने अापल्या पहिल्याच सामन्यात बडोद्याचे अाव्हान लिलया परतवून लावले. कर्णधार अजिंक्य रहाणे, पृथ्वी शाॅ अाणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतकी खेळीमुळे मुंबईला सहज विजय मिळवता अाला. मात्र भारताच्या कसोटी संघात स्थान मिळविणारा मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शाॅचे शतक मात्र अवघ्या दोन धावांनी हुकले.


कृणाल पंड्याची चमक

नाणेफेक जिंकून बडोद्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने ८ चौकार अाणि २ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची घणाघाती खेळी केली. त्यामुळे बडोद्याला ४९.५ षटकांत २३८ धावांपर्यंत मजल मारता अाली.


शाॅ-रहाणेची मोठी भागीदारी

सलामीच्या फलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे मुंबईने हे अाव्हान अवघ्या ४१.३ षटकांत पार केले. पृथ्वी शाॅ अाणि अजिंक्य रहाणे यांनी १३७ धावांची सलामी नोंदवली. पृथ्वी शाॅ माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद ५६ धावा फटकावत मुंबईला विजय मिळवून दिला.


हेही वाचा -

क्रांती साळवीची नऊवारी नेसून मॅरेथाॅनमध्ये धाव, गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद

जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकला रौप्यपदक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा