Advertisement

जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकला रौप्यपदक


जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकला रौप्यपदक
SHARES

तुर्की येथे झालेल्या जागतिक ज्युनियर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईत जन्मलेला ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक याने रौप्यपदकाला गवसणी घालत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला. अंतिम फेरीत विजय अावश्यक असताना अभिमन्यूने अर्मेनियाचा ग्रँडमास्टर अराम हाकोब्याम याच्यावर विजय मिळवत ८.५ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. इराणचा ग्रँडमास्टर परहाम माघशोडलो याने ९.५ गुणांसह सुवर्णपदक पटकावण्याची करामत केली. या स्पर्धेत पदक मिळवणारा अभिमन्यू हा भारताचा एकमेव बुद्धिबळपटू अाहे.


असे पटकावले रौप्य

२३वे मानांकन मिळालेल्या अभिमन्यूने या स्पर्धेत चौथ्या मानांकित एम. कार्तिकेयन, १०व्या मानांकित अरविंद चिदंबरम अाणि १३व्या मानांकित एसएल नारायणन या भारतीय खेळाडूंवर मात करत रौप्यपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत अभिमन्यूपाठोपाठ ४०व्या मानांकित हर्ष भारतकोटी याने ७.५ गुणांसह नववा क्रमांक प्राप्त केला.


महिलांमध्ये वर्षिनी १३वी

महिलांच्या गटात अलेक्झांड्रा माल्टसेवस्काया हिने ८.५ गुणांनिशी सुवर्णपदक पटकावले. भारताकडून महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वी. वर्षिनी हिने सर्वोत्तम कामगिरी केली. १३ पैकी ७ गुण पटकावून तिने १३वा क्रमांक प्राप्त केला. पाचव्या फेरीत गुलरुखबेगिम तोखिरजोनोवा हिच्याकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर वर्षिनीने पुढील पाच सामन्यात ४.५ गुणांची कमाई केली.


हेही वाचा -

सचिन तेंडुलकरने अायएसएलच्या केरळ ब्लास्टर्समधील हिस्सा विकला

ब्रेट लीने घेतलं बाप्पाचं दर्शन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा