Advertisement

12 मे पासून विजय मांजरेकर-रमाकांत देसाई स्मृती क्रिकेट स्पर्धा


12 मे पासून विजय मांजरेकर-रमाकांत देसाई स्मृती क्रिकेट स्पर्धा
SHARES

शिवाजीपार्क जिमखान्यातर्फे विजय मांजरेकर-रमाकांत देसाई स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 मे ते 14 मे या कालावधीत होणार आहे. याच जिमखान्याने आजपर्यंत अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. त्यातीलच विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई हे दोन क्रिकेटपटू. त्यांच्या नावे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, यापूर्वी विजय मांजरेकर एकेरी आणि रमाकांत देसाई दुहेरी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात होते. त्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचाही समावेश होता. तसेच माजी कसोटीपटू संदीप पाटील हे विजय मांजरेकर एकेरी स्पर्धेचे पहिले विजेते होते. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील तीन वेळा या स्पर्धेत विजयी झाला आहे. स्थानिक पातळीवरील खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी शिवाजी पार्क जिमखान्याने विजय मांजरेकर-रमाकांत देसाई स्पर्धेचे आयोजन एकत्र सुरू केले. मुंबईतील स्थानिक क्रिकेट स्पर्धेत आपले नाव गाजवलेले आठ संघ यात सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेतील विजेत्यास एक लाख रुपये तर उपविजेत्यास 50 हजार रुपये आणि करंडक देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा