Advertisement

विराटचा असाही विक्रम, ३ सामन्यांच्या मालिकेत नोंदवली शतकांची हॅटट्रिक


विराटचा असाही विक्रम, ३ सामन्यांच्या मालिकेत नोंदवली शतकांची हॅटट्रिक
SHARES

भारताचा विक्रमवीर विराट कोहलीनं शनिवारी अापल्या शिरपेचात मानाचा अाणखी एक तुरा रोवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत शतकांची हॅटट्रिक नोंदवणारा पहिला अांतरराष्ट्रीय कर्णधार ठरण्याचा विक्रम कोहलीनं अापल्या नावावर केला. शनिवारी विराटनं कसोटीत ५००० धावांचा पल्लाही गाठला. विशेष म्हणजे, फिरोजशाह कोटला या अापल्या घरच्या मैदानावर विराटनं पहिलं शतक अाज साजरं केलं.


एकमेवद्वितीय विराट

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन किंवा चार शतके झळकावणारे अनेक होऊन गेलेत. मात्र विराटच्या कामगिरीला तोड नाहीत. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत शतकांची हॅटट्रिक नोंदवणारा विराट हा एकमेवद्वितीय ठरला अाहे.


वेगवान ५००० धावा करणारा चौथा भारतीय

सर्वाधिक वेगवान ५००० धावा करणारा विराट हा भारताचा चौथा फलंदाज ठरला अाहे. सुनील गावस्कर यांनी ९५ डावांत, वीरेंद्र सेहवागनं ९८ डावात तर सचिन तेंडुलकरनं १०३ धावात कसोटीत ५००० धावा केल्या होत्या.

संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा