Advertisement

'रनमशीन' विराट कोहलीनं सचिनचा आणखी एक विक्रम मोडला

भारताचा कर्णधार विराट कोहली यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.

'रनमशीन' विराट कोहलीनं सचिनचा आणखी एक विक्रम मोडला
SHARES

भारतीय क्रिकेट संंघाचा कर्णधार विराट कोहली यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं १२ हजार धावा केला. वेगानं १२ हजार धावा करत विराटनं भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला मागे टाकलं आहे. सचिननं वनडे क्रिकेटमध्ये ३०० डावात १२ हजार पूर्ण केल्या होत्या.

विराट कोहलीनं ही कामगिरी फक्त २४२ धावात केली आहे. कॅनबेरा इथं सुरू असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराटनं २३वी धाव करताच या विक्रमाला गवसणी घातली. याआधी विराटनं वनडेमध्ये सर्वात वेगानं ८ हजार, ९ हजार, १० हजार आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे.

विराटनं २५० वनडे सामन्यातील २४१ डावा ५९.२९च्या सरासरीनं ११ हजार ९७७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४३ शतक आणि ५९ अर्धशतक आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

विराटची कामगिरी

  • १ हजार धावा- २४ डाव
  • २ हजार धावा- ५३ डाव
  • ३ हजार धावा- ७५ डाव
  • ४ हजार धावा- ९३ डाव
  • ५ हजार धावा- ११४ डाव
  • ६ हजार धावा- १३६ डावा (हाशिम अमला १२३ डाव नंतर दुसऱ्या स्थानावर)
  • ७ हजार धावा- (हाशिम अमला १५० डाव नंतर दुसऱ्या स्थानावर)
  • ८ हजार धावा- १७५ डाव (सर्वात वेगाने)
  • ९ हजार धावा- १९४ डाव (सर्वात वेगाने)
  • १० हजार धावा - २०५ डाव (सर्वात वेगाने)
  • ११ हजार धावा- २२२ डाव (सर्वात वेगाने)
  • १२ हजार धावा- २४२ डाव (सर्वात वेगाने)
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा