Advertisement

विराटचा आणखी एक विक्रम, इन्स्टाग्रामवर तब्बल 'इतके' फॉलोअर्स

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहे. त्याने आता आणखी एक विक्रम केला आहे. मात्र हा मैदानाबाहेरचा रेकॉ़र्ड नसून सोशल मीडियावरचा आहे.

विराटचा आणखी एक विक्रम, इन्स्टाग्रामवर तब्बल 'इतके' फॉलोअर्स
SHARES

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहे.  त्याने आता आणखी एक विक्रम केला आहे. मात्र हा मैदानाबाहेरचा रेकॉ़र्ड नसून सोशल मीडियावरचा आहे. विराटचे इन्स्टाग्रामवर १०० मिलियन म्हणजेच १० कोटी फॉलोअर्स झाले आहे. 

१०० मिलियन फॉलोअर्स असणारा विराट जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे. विराट कोहलीच्या या यशाबद्दल इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने याबाबतीत फक्त धोनीच नाही तर, शाहरुख-सलमान खान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागे टाकलं आहे. 

विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव् असतो. तिथं तो अनेक व्हिडीओज, फोटो शेअर करत असतो. विराट कोहलीला इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी भरपूर पैसे देखील मिळतात. इन्स्टाग्रामकडून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये देखील विराटचं नाव आहे.

 जगभरात इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल क्रमांकावर आहे. रोनाल्डोचे २६.६ कोटी इतके फॉलोअर्स आहेत. यानंतर एरियाने ग्रांडेचे २२.४ कोटी, अभिनेता ड्वेन जॉनसनचे २.२० कोटी, काइल जेनरचे २.१८ कोटी फॉलोअर्स आहेत.

 इन्स्टाग्रामवर १० कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेले एकूण ४ खेळाडू आहेत. खेळाडूंच्या यादीमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो नंबर एक वर अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी दुसर्‍या क्रमांकावर आणि ब्राझीलचा नेमार तिसर्‍या स्थानावर आहे.  

भारतात विराटनंतर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबाबतीत अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नंबर आहे. प्रियांकाचे एकूण ६.०८ कोटी इतके फॉलोअर्स आहेत. तर त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरचे ५.८ कोटी फॉलोअर्स आहेत. दीपिका पादुकोणचे ५.५५ कोटी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ५.१२ कोटी फॉलोअर्स आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा