विराट कोहली आयपीएलच्या 10व्या सीझनमध्ये खेळणार

 Mumbai
विराट कोहली आयपीएलच्या 10व्या सीझनमध्ये खेळणार

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच आयपीएल 10 मध्ये परतणार असल्याचे त्याने ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ टाकून त्याने त्याच्या चाहत्यांना खूश केले आहे.  नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने विराट आयपीएल 10 खेळणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे विराटच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती. पण नुकताच त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लवकरच मी मैदानात परतणार असल्याचे त्याने सांगितले.     
तिसऱ्या कसोटीत विराटच्या खांद्याला दुखापात झाल्यामुळे विराट खेळू शकला नाही. डॉक्टरांनी देखील विश्रांती घेण्यास सांगितले असल्यामुळे आयपीएल खेळणार का नाही हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र विराटने ही व्हिडिओ टाकून आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये खेळणार असल्याचा खुलासा केला.

Loading Comments