Advertisement

लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने केली अँजिओग्राफी

वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लारा याला छातीत दुखत असल्याने मंगळवारी मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने केली अँजिओग्राफी
SHARES

वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लारा याला छातीत दुखत असल्याने मंगळवारी मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लाराची अँजिओग्राफी केल्यानंतर त्याच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचं स्पष्ट झालं. लारा सध्या ५० वर्षांचा आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने लारा मुंबईत क्रिकेटवरील विश्लेषणात्मक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला आहे.  

लारा नव्वदच्या दशकातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. त्याकाळातील बहुतेक सर्वच गोलंदाजांवर त्याचा दबदबा होता. त्याची  तुलना नेहमीच सचिन तेंडुलकर व्हायची. 

कसोटीतील १३१ सामन्यात लाराने ११,९५३ कुटल्या आहेत. यांत ३४ शतकं आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत ४०० धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

तर, वनडेतील २९९ सामन्यात त्याने १०,४०५ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने १९ शतकं आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. लारा आपला शेवटचा सामना २००६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळला होता.



हेही वाचा-

टीम इंडियाला जबर धक्का, गब्बर वर्ल्डकपमधून बाहेर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा