Advertisement

सुप्रिमो चषक स्पर्धेत मराठा पंजाब तिसऱ्यांदा चॅम्पियन!


सुप्रिमो चषक स्पर्धेत मराठा पंजाब तिसऱ्यांदा चॅम्पियन!
SHARES

टेनिस क्रिकेटमधील सुप्रिमो चषक या नावाजलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या यंदाचा मोसमाचा शेवटही तेवढाच थरारक ठरला. विनर स्पोर्टस मराठा पंजाब संघाने जेतेपदाच्या लढतीत डोंबिवलीच्या शांतिरत्न प्रतिक संघाला ९ धावांनी पराभूत करून तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.


शाहीद शेख, सुमित ढेकळेची फटकेबाजी

शाहीद शेख अाणि सुमित ढेकळे यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे विनर स्पोर्टस मराठा पंजाबने ८ षटकांत ५ बाद ७९ धावा उभारल्या. शाहीदने २३ तर सुमितने २६ धावांची खेळी केली. हे अाव्हान पार करताना शांतिरत्न प्रतिकला ८ षटकांत ८ बाद ७० धावांपर्यंतच मजल मारता अाली. अंबुटीने चार विकेट्स मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला.


उपांत्य फेरीचा थरार...

पहिल्या उपांत्य लढतीत विनर स्पोर्टस मराठा पंजाबने गावदेवी चांदीप संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. शाहिद शेख नाबाद (२५) व सुमित ढेकळे (२३) हे विनरच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दुसऱ्या उपांत्य लढतीत डोंबिवलीच्या शांतिरत्न प्रतिकने मुंबईच्या शिवशक्ती पाले सँडी संघावर ७ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती. आकाश तारेकर (नाबाद २४) व एजाज कुरेशी (१५) यांनी शांतिरत्नच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.


हेही वाचा -

सुप्रिमो क्रिकेट : शिवशक्ती एसपी इलेव्हन उपांत्य फेरीत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा