Advertisement

सुप्रिमो क्रिकेट : शिवशक्ती एसपी इलेव्हन उपांत्य फेरीत


सुप्रिमो क्रिकेट : शिवशक्ती एसपी इलेव्हन उपांत्य फेरीत
SHARES

शिवशक्ती एस पी इलेव्हनने गुजरातच्या एकता संघाचा आठ विकेटसनी पराभव करून सुप्रिमो चषक क्रिकेट आंतरराज्य स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. वाकोला-कालिना येथील एअर इंडिया मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत निर्धारित ८ षटकांमध्ये एकता संघाला ५ बाद ५४ इतकीच मजल मारता अाली. ओंकार देसाई (नाबाद २६) आणि श्रेयस इंदुलकर (१८) यांच्या फलंदाजीच्या जोरावर शिवशक्तीनं हे लक्ष्य ६.२ षटकांत पार केलं.


एकताचा विक्रोळीयन्सवर विजय

त्याअाधीच्या सामन्यात गुजरातच्या एकता संघाने अटीतटीच्या लढतीत विक्रोळीयन्सचा दोन विकेट्स अाणि एक चेंडू शिल्लक ठेवून पराभव केला होता. विक्रोळीयन्स रचलेली ४ बाद ६५ ही धावसंख्या गाठताना गुजरात संघाच्या नाकात दम आला होता. सुरुवातीलाच पडझड झाल्यामुळे त्यांचा अर्धा संघ ३.३ षटकांत केवळ २० धावांत गारद झाला होता. अखेर ८ बाद ३८ अशा स्थितीतून साकिद शेखने त्यांना अनपेक्षितपणे विजय मिळवून दिला.


हेही वाचा -

सुप्रिमो चषक क्रिकेट : शांतिरत्न प्रतिक इलेव्हनचे धडाकेबाज विजय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा