Advertisement

सुप्रिमो चषक क्रिकेट : शांतिरत्न प्रतिक इलेव्हनचे धडाकेबाज विजय


सुप्रिमो चषक क्रिकेट : शांतिरत्न प्रतिक इलेव्हनचे धडाकेबाज विजय
SHARES

सुप्रिमो चषक आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी शांतिरत्न प्रतिक इलेव्हनने दोन्ही सामन्यात दमदार विजयांची नोंद करीत उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. शांतिरत्न प्रतिकने यूएस इलेव्हनचे ७१ धावांचे आव्हान सहज पार करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर तिरूपती सावर्डे चिपळूण संघासमोर ८७ धावांचे लक्ष्य ठेऊन त्यांना ७४ धावांत रोखले अाणि उपांत्य फेरी गाठली.


शांतिरत्नचा १२ धावांनी विजय

उपांत्य फेरीच्या लढतीत शांतिरत्न प्रतिक इलेव्हनने अविनाश रामगुडेच्या झंझावातामुळे ६ बाद ८६ धावांचा डोंगर उभारला. अविनाशला पंकज जाधवचीही (१४) साथ लाभली. चिपळूणच्या तिरूपती सावर्डे संघाच्या अक्षय पाटीलने १९ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. ८७ धावांचा पाठलाग करताना तिरूपती सावर्डेकडून प्रथमेश पवार (१८), संदीप मकवाना (१७) आणि विजय पावले (१५) यांनी वेगवान खेळ केला, पण त्यांचा संघ ७४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.


पालघर दांडीचा सामना बरोबरीत

दुसरा साखळी सामना अत्यंत थरारक झाला. पालघरच्या स्टार सीसी दांडी संघाच्या प्रितम बारीने शेवटच्या षटकांत २० धावा कुटल्यामुळे त्यांना ५ बाद ६७ अशी समाधानकारक धावसंख्या उभारता अाली. या धावांचा पाठलाग करताना नितीन माटुंगेच्या झंझावातामुळे हा सामना थरारकरित्या बरोबरीत सुटला. नितीनने ११ चेंडूंत ३ षटकार आणि २ चौकार खेचत नाबाद ३० धावा ठोकल्या.


सुपर-अोव्हरचा थरार

या बरोबरीमुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. ज्यात स्टार सीसी दांडी संघाने केवळ ८ धावा केल्या. तिरूपती सावर्डेला ९ धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर ३ धावांची अावश्यकता होती. अखेर माटुंगेने उत्तुंग षटकार खेचत संघाला थरारक विजयश्री मिळवून दिली. सुप्रीमो चषकाच्या इतिहासात सुपर ओव्हरमध्ये खेळला गेलेला हा चौथा सामना आहे.


हेही वाचा -

कलिना-रायगडने जिंकला सुप्रिमो चषक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा