पालघरमध्ये महिला क्रिकेटचं धुमशान

 Palghar
पालघरमध्ये महिला क्रिकेटचं धुमशान
Palghar, Mumbai  -  

पालघर - अलेवाडी येथे शिवसेनेच्या वतीने दोन दिवसीय महिला क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे चूल आणि मूल या पलीकडे ही जाऊन महिला जशा पुरुषांच्या बरोबरीने काम करतात तसेच खेळात ही महिलांनी आपले प्राविण्य दाखवून दिले आहे. सदर क्रिकेट सामने हे 25 आणि 26 मार्च रोजी आयोजित केले होते. या वेळी स्पर्धेचे उदघाटन अलोवाडीचे शिवसेना शाखा प्रमुख राजेंद्र वाडीकर यांनी केले. तर अंतिम सामनाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य मनीषा पिंपळे आदी उपस्थित होते.

अंतिंम सामना मुरबे आणि भिरवाडी या दोन संघात झाला. यामध्ये मुरबे संघ विजयी ठरला. अंतिम समन्यात विजयाची शिल्पकार ठरली ती संघाची कर्णधार सिद्धेश्वरी पागधरे. सिद्धेश्वरीने पहिल्या सामन्यामध्ये 14 षटकारांच्या मदतीने 22 चेंडूंत 100 धावा ठोकल्या. तर अंतिम सामन्यात 14 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 23 चेंडूंत 101 धावा ठोकल्या.

Loading Comments