'यश राज फिल्म'ने सादर केले सुशांतसोबतचेे कॉन्ट्रॅक्ट


'यश राज फिल्म'ने सादर केले सुशांतसोबतचेे  कॉन्ट्रॅक्ट
SHARES
मुंबईत अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये घराणेे शाही सुरू असल्याचा वाद चवाट्यावर आला. सुशांतच्या आत्महत्येची कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मग चौकशीच्या फैरी आणि बड्या कंपन्यांना सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट सादर करण्याचे निर्देश दिले. माञ अद्याप ही सुशांतच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच आहे.


बिहारच्या पटणा येथील असलेला  मूळचा सुशांतने पविञ रिश्ता या सिरियलमधून सुरूवात केली. या सिरियलमधील त्याच्या भूमिकेतून त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर 2013 मध्ये काय पो छे या चिञपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पन केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी, एम.एस.धोनी, राबता, वेल्कम टू, केदारनाथ,  सोनचिरिया, छिचोरे, ड्राईव्ह आणि दिल बेचारा हे सिनेमे त्याने केले. त्यातील शुद्ध देसी रोमान्स, एम.एस.धोनी, पीके, कायपो छे,केदारनाथ या चिञपटातील भूमिकांमधून त्याने त्याची वेगळी ओळख निर्माण केली होती. माञ यशाच्या शिखरावर असताना ही अश्या कोणत्या गोष्टीवरून त्याने आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलेले नाही.

सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांची चौकशी केली. त्यात त्याचे जवळचे मिञ, मैञिण, नोकर, मँनेजर अशांचा समावॆश आहे. माञ त्यांंच्या चौकशीतून ही काहीही पोलिसांना आढळून आलेले नाही. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी त्याचा फोन ही न्यायवैद्यकिय तपासणीसाठी पाठवलेला असल्याचे कळते. त्याच्या घरात तो दररोज लिहित असलेल्या दैनदिन डायऱ्यांची ही झाडा झडती सुरू आहे. माञ सुशांतच्या आत्महत्येमागील कोणतेही कारण अद्याप समोर आलेलं नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल  मिडियावर  बॉलीवूडमध्ये घराणे शाही सुरू असल्याचा आरोप होऊ लागला. मग या प्रकरणात अनेकांनी उड्या घेत आप आपल्या प्रतिक्रिया दिल्या, सुशांतला काम मिळत नव्हते. तसेच मिळालेले काम ही काही जणांच्या हस्तक्षेपामुळे गेल्याने तो मानसिक तणावाखाली होता. त्यातून त्याने हे पाऊल उचलल्याच्या वावड्या उठल्यानंतर पोलिसांनी सुशांतने काम केलेल्या प्रत्येक कंपनीला कॉन्ट्रॅक्ट सादर करण्याचे निर्देश पोलिसांनी दिलेे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथक बनवली आहेत. पोलिसांच्या निर्देशानंतर शनिवारी यशराज फिल्मकडून सुशांतसोबत करण्यात आलेल्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर पोलिसांना देण्यात आलेले आहे.गरज पडल्यास या संबंधीत व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे.  त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.

या आत्महत्येप्रकरणी आता बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्यासह एका अभिनेत्रीचा जाब नोंदवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील चौकशीसाठी 3 विशेष टीम तयार करण्यात आल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध् चेहरे समोर येऊन बोलू लागले आहेत. अशातच सोनू निगम यानेही एक खळबळजनक दावा केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील एका बड्या कंपनीमुळे अनेक गायक आत्महत्येचा पर्याय स्वीकारू शकतात, असे सोनू निगमने म्हटले आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा