व्यापाऱ्याला लुटणारा आरोपी जेरबंद

मालाड - व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्याला अखेर मालाड पोलिसांनी अटक केलीय. राजन राजभर असं या आरोपीचं नाव असून, त्याने अजून दोघांची नावे घेतली आहेत. 3 सष्टेंबरच्या रात्री इमिटेशनचा व्यवसाय करणारे राजेंद्र शहा दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्यावर तिन अज्ञात बाईकस्वाईनी रॉडने हल्ला करत, त्यांच्याकडून तीन लाखांची रक्कम लंपास केली. मात्र ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली. आणि सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस ओरोपीपर्यंत पोहोचले. अोरोपीला कांदीवली पूर्व परिसरातील पोईसर बिहारी टेकडीतून ताब्यात घेतल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर महाडिक यांनी सांगितलं.

Loading Comments