बनावट पासपोर्टप्रकरणी चौघांना अटक

 Mumbai
बनावट पासपोर्टप्रकरणी चौघांना अटक

मरिन ड्राइव्ह - बनावट पासपोर्टप्रकरणी मरिन पोलिसांनी चौघांना रविवारी अटक केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपीनं बर्लिन येथे नोकरीला लावून देण्याचं आमिष दाखवून गुजरातच्या कच्छमधल्या ग्रामस्थांची फसवणूक केली. त्यांच्याकडे असलेल्या अपुऱ्या कागदपत्रांचा फायदा उचलत आपली जर्मनीत ओळख असून काही पैशांत तुमचे पासपोर्ट बनवून देतो असं सांगत आरोपीने त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले आणि त्यांना बनावट टुरिस्ट व्हिसा बनवून दिला. 12 नोव्हेंबर रोजी यातले तिघेजण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जर्मनीला जायला निघाले. मात्र जर्मन काउंसिल विभागानं आरोपींचे व्हिसा आणि कागदपत्र तपासली असता ती बनावट असल्याचं उघड झालं.

त्यानंतर जर्मन काउंसिल विभागानं त्यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्या तिघांची चौकशी करून मुख्य आरोपीला सापळा रचून अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी जादूभाई (43) याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित तीन आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुदर्शन पाटील यांनी सांगितलं.

आरोपी

मंजी विश्रीम कुडिया 37

रमेश वरसानी 35

शैलेशगर गोसाईर 37

Loading Comments