म्हाडाच्या आणखी एका घोटाळ्याचा पर्दाफाश


SHARES

गोरेगाव - घोटाळेबाज म्हाडाचा आणखी एक घोटाळा ‘मुंबई लाइव्हनं’ समोर आणलाय. गोरेगाव, मोतीलालनगर नंबर-1 च्या लेआऊटमध्ये म्हाडाचे अधिकारी, विकासक आणि आर्किटेक्ट या भ्रष्ट युतीनं फेरबदल केल्याचं समोर आलंय. प्लॉट क्र. 47 मधील 6 घरं आणि प्लॉट क्र. 51 मधील 8 अशी 14 घरं मोतीलालनगर नं.-1 च्या लेआऊटमधून गायब करत या घरांची जागा बिल्डरच्या घशात घातलीय. ‘मुंबई लाइव्ह’च्या हाती लागलेल्या कागदपत्रानुसार मोतीलाल नगरला लागूनच सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ वसाहत आहे. या वसाहतीचा पुनर्विकास वादग्रस्त ठरला आहे. पत्राचाळीच्या पुनर्विकासांतर्गत म्हाडा आणि रहिवाशांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या गुरूआशिष बिल्डरच्या घशात ही जागा घालण्यात आलीय. मूळ लेआऊटमधील ही जागा पत्राचाळीच्या लेआऊटमध्ये परस्पर बदल करुन या भ्रष्ट युतीनं घशात घातलीय. इतक्यावरच हे थांबलेले नाही तर आता ही जागा ताब्यात घेण्यासाठी रहिवाशांवर दबाव आणला जातोय. दरम्यान म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्या (गोरेगाव विभाग) नी लेआऊटमध्ये फेराफर झाल्याची कबुली ‘मुंबई लाईव्ह’शी बोलताना दिलीय. तर या 14 रहिवाशांना पत्राचाळीच्या लेआऊटमधून वगळ्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलंय. मात्र कायदा धाब्यावर ठेवणाऱ्या अधिकारी, आर्किटेक्ट आणि विकसकांवर कारवाई होणार का या प्रश्नावर त्यांनी छुप्पी साधलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा