जुहूत १० वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू


जुहूत १० वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू
SHARES

जुहू परिसरात एका १० वर्षीय मुलाचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विवेक गने असं या मुलाचं नाव असून त्याचा मृतदेह घरातील छताला लटकलेल्या स्थितीत दिसून आला.

शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचं कारण गळफास आलं असलं तरी ज्या परिस्थितीत विवेकचा मृतदेह सापडला आहे, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


काय आहे प्रकरण?

जुहूच्या जेव्हीपीडी जवळील झोपडपट्टीत विवेक आई-वडील आणि बहीण सोबत राहायचा. विवेकचे वडील गुजरात येथे कामाला असून आई घरकाम करते. विवेक अतिशय खोडकर असल्याने त्याची आई कामाला जाताना त्याला घरात बंद करून जात असल्याचंही काही जण सांगतात.


खोडकर स्वभाव

बुधवारी त्याची आई नेहमीप्रमाणे घर बाहेरून बंद करून कामाला गेली होती. त्यानंतर थेट रात्री साडेआठच्या सुमारास परतल्यावर दरवाजा उघडताच त्याच्या आईला धक्काच बसला. विवेकचा मृतदेह छताला लटकलेला होता. विवेकला तात्काळ खाली उतरवून जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर कूपर रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं.


गळफास कसा?

छताच्या ज्या लोखंडी बीमला विवेकचा मृतदेह लटकलेला होता, तो बीम १० ते १२ फूट उंचीवर आहे. या बीमला ओढणी बांधून गळफास घेणं १० वर्षाच्या मुलाला शक्य आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. स्वभावाने खोडकर असलेला विवेक ओढणीला लटकून खेळत होता का? तसं असेल तर त्याला गळफास कसा बसला? याचा शोध व्हावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबाने केली आहे.



हेही वाचा -

बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार तेलगीचा मृत्यू

झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा