झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल


झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल
SHARES

इस्लामचा वादग्रस्त धर्म प्रचारक झाकीर नाईकविरोधात राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआयए)ने गुरुवारी आरोपपत्र दाखल केलं. दहशतवादाला खतपाणी घालणं, प्रक्षोभक भाषण करणं त्याच बरोबर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासारखे गंभीर आरोप झाकीरवर ठेवण्यात आले आहेत. झाकीरच्या वकिलांनी या आरोपपत्राला विरोध केला असून फरार आरोपीवर आरोपपत्र दाखल करता येत नसल्याचा युक्तीवाद त्यांनी केला.

 

काय आहे आरोपत्रात?

'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' संस्थेच्या मदतीने तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करणं, प्रक्षोभक भाषणे करणं त्याच बरोबर दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासारखे गंभीर आरोप 'एनआयए'ने झाकीर आणि त्याच्या संस्थेवर केले आहेत. १ हजार पानी आरोपत्रात 'एनआयए'ने झाकीरच्या भाषणांच्या लेखाजोखा, त्यांच्या सीडीच्या प्रती जोडल्या आहेत. आरोपत्रात ६० साक्षीदारांचे जबाब देखील 'एनआयए'ने जोडले आहेत.  


कधी झालं उघड?

२००७ ते २०११ दरम्यान 'आयआरएफ'च्या वतीने मुंबईत भरवण्यात आलेल्या 'पीस कॉन्फरन्स'मध्ये झाकीर नाईकने प्रक्षोभक भाषणे केल्याचं तपासात उघड झाल्याचं 'एनआयए'ने म्हटलं आहे. या कॉन्फरन्समध्ये धर्मांतराला देखील खत पाणी घातल्याचं 'एनआयए'ने म्हटलं आहे.


देणगी स्वीकारल्या

झाकीर नाईकच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात देशातील तसेच परदेशातील लोकांकडून ठेवी स्वीकारल्या असून हा सगळा पैसा रियल इस्टेट तसेच खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा दावा 'एनआयए'ने आरोपपत्रात केला आहे.


ढाका हल्ल्यानंतर खळबळ

बांग्लादेशातील ढाका येथे २०१६ मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा झाकीर नाईकचं नांव समोर आले होतं. या हल्यातील दशतवादी झाकीरचे फोलोअर्स असल्याचं समोर येताच देशातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. एकीकडे भारतातील तपास यंत्रणांनी झाकीरवरील फास आवळण्यास सुरूवात केली, तर दुसरीकडे झाकीरच्या पीस टीव्हीवर बांग्लादेशने देखील बंदी घातली. या सगळ्या घटनांनंतर झाकीरला भारतातील आपला गाशा गुंडाळावा लागला. तेव्हापासून आजपर्यंत झाकीर नाईक परदेशात लपून बसला आहे.  



हेही वाचा

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला का असुरक्षित? वाचा...

आयआयटी बॉम्बेमधील सायकल कुणी पळवली? हे कळाल्यावर तुम्हीही थक्क व्हाल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा