Advertisement

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला का असुरक्षित? वाचा...


लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला का असुरक्षित? वाचा...
SHARES
Advertisement

मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात अत्याचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. या घटनांमुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या महिला डब्यात पोलीस असतात. पण तरीही अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. याबाबत `मुंबई लाइव्ह`ला मिळालेला आकडा हा अत्यंत चिंताजनक आहे.

2011 साली मुंबईच्या लोकलमध्ये विनायभंगाचे केवळ 4 घटना समोर आल्या होत्या. पण 2017 साली 30 सेप्टेंबर पर्यंत या आकड्यात वाढ होऊन 73 वर पोहोचला आहे. यावर्षी रेल्वे परिसरात 8 बलात्कारांच्या घटना देखील घडल्या आहेत. रोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांवार अत्याचाराच्या घटना समोर येत असून कधी धावत्या लोकलमध्ये एकट्या मुलीला बघून तिच्यासमोर अश्लील चाळे केले जातात. शनिवार आणि रविवारी लागोपाठ सीएसटीएम स्थानकात असे प्रकार समोर आल्याने जीआरपी आणि रेल्वे प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


गरजेच्या वेळी तात्काळ मदत पोचवणे अशक्य - डीआरएम 

महिलांच्या सुरक्षे बाबत मध्य रेल्वेचे डीआरएम एस. के. जैन यांना विचारले असता अशा प्रकरणांत तात्काळ मदत पोचवण हे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चेन खेचल्यावर देखील ट्रेन ही स्थानकातच जाऊन थंबते. त्याच बरोबर अशा वेळी सीसीटीव्ही देखील फार उपयोगी नसल्याचे ते म्हणाले. महिलांवरील वाढते अत्याचार कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्यात या प्रश्नावर मात्र त्यांनी चुप्पी साधली.


या घटनेला फ्री वायफाय जबाबदार - रेल्वे कार्यकर्ते

लोकलमध्ये महिलांवरील अत्याचारच्या घटना वाढत असल्याचे मुख्य कारण हे स्थानकातील फ्री वायफायची सेवा असल्याची प्रतिक्रिया उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रेल्वे मॉनिटरिंग कमिटीचे मेंबर आणि रेल्वे कार्यकर्ते भावेश पटेल यांनी `मुंबई लाइव्ह`ला दिली.

फ्री वायफायच्या नादात रिकामटेकडी लोकं स्थानकात फिरतात, अश्लील व्हिडिओ बघतात आणि एक्साइटेड होऊन मग असे प्रकार होत असल्याचे ते पुढे म्हणाले.
रेल्वे स्थानकांना कित्येक एंट्री-एक्झिट पॉइंट आहेत. त्याचबरोबर प्रत्येक स्थानकातील सीसीटीव्हीच योग्य प्रकारे मॉनिटरिंग होत नसल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.


विनयभंगांची आकडेवारी

  • 2011 : 4
  • 2012 : 12
  • 2013 : 22
  • 2014 : 28
  • 2015 : 51

हेही वाचा - 

४ ट्रेनमध्येच आहे पॅनिक बटण! मुंबईत महिलांची सुरक्षा रामभरोसेच!


संबंधित विषय
Advertisement